नाशिक : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून, योग्य उपचाराअभावी बहुतांश रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. तर आज नाशिक मध्ये नागरिकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले, तरी रुग्णालयाकडून मात्र टंचाईचे कारण सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनाचा काळा बाजार चालू असून अनेकांना दुर्दैवाने चढ्या भावाने रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे.
अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर धक्कादायक विधान केले आहे. रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे जानेतेमध्ये आता याचा संताप व्यक्त केला जात आहे.
रेमडेसीवीर मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत, याकडे भुजबळांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, लोकं रस्त्यावर उतरणार त्याला काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शन काय आमच्या घरी तयार होत नाही, असं सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळलं तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो, असे ते नंतर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस संपल्याने बीड जिल्ह्यात लसीकरण बंद
- म्यानमारमधील हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रसंघात भारताने घेतली भूमिका
- पुरस्कार मिळाल्यांनतर तापसीकडून कंगनाची स्तुती ; कंगना म्हणाली…
- जोपर्यंत देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकार चालू देतील तोपर्यंतच हे सरकार चालणार : आठवले
- तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय


