Share

केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद मनपाची खरडपट्टी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेने सर्वेक्षण करुन शहरात २६ कन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. यातील काही भागांमध्ये केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि.९) पाहणी केली. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची ये-जा बंद करा. कडक निर्बंधांचे पालन करा, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय पथकाने पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली.

औरंगाबादेत वाढती कोरोनाची संख्या पाहता सर्वेक्षणासाठी दोन दिवसांपासून केंद्रीय पथक दौर्‍यासाठी आले आहे. या पथकाने पहिल्या दिवशी गुरुवारी ( दि.८) ग्रामीण भागात पाहणी केली. तर शुक्रवारी पथकाने शहरातील कन्टेनमेंट झोन अर्थातच प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी केली. दरम्यान, कोरोना चाचणी कक्ष, कोविड केअर सेंटर्सलाही पथकाने भेटी दिल्या. पालिकेतील वॉर रुमचाही आढावा घेतला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून पथकातील सदस्य डॉ. अभिजित पाखरे यांनी शहरात पाहणी दौर्‍यास सुरुवात केली.

प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्या त्या प्रभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी व माजी नगरसेवक यांचीही उपस्थिती होती. प्राप्त माहितीनुसार डॉ. पाखरे यांनी कोणत्या प्रतिबंधित क्षेत्रात किती रुग्ण आहेत, किती दिवसांपासून हे रुग्ण आहेत, ज्या घरात रुग्ण आढळले त्या घराच्या आजूबाजूच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली आहे का, नागरिकांचे लसीकरण केले आहे का, याची माहिती जाणून घेतली.

तेव्हा प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. यावर पथकाने आक्षेप घेतला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची जे-जा बंद करा, त्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशी ताकीद त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना दिली.
आशा वर्कर्सच्या कामाची देखील तत्यांनी यावेळी प्रशंंसा केली. माजी नगरसेवकांचा सक्रीय सहभाग असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!