सातारा : लॉकडाऊन विरोधात राज्यभरात रोष व्यक्त होत असतांना राज्य शासनाने आणखी कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उद्यापासून नो लॉकडाउन म्हणत ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं.’ असंही यावेळी उदयनराजेंनी बोलून दाखवलं. यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
‘ज्याचं हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनमुळं काय अवस्था झाली असेल. करोनावरील लसीकरण मिळत नाही आणि ज्यांना करोना लस दिलीये ते पॉझिटिव्ह मिळत आहेत. हा काय बाजार मांडलाय का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, लॉकडाउन हटवून टाका असं मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो. हे सगळं धुळफेक आहे. वाझे प्रकरण लपवण्यासाठी आहे,’ असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, मी दुकानदार किंवा व्यापाऱ्यांच्या बाजूने नाही बोलत, मी सर्वसामान्यांच्या बाजूने बोलत आहे. तुम्ही सगळं बंद तुम्ही केलं . उपासमारी तुम्ही आणली. तुमच्या बापाची इस्टेट आहे. आजची परिस्थिती आली आहे, त्याला तुम्ही जबाबदार आहात.सणासुदीचे दिवस आलेत. कामगार लोक आहेत, व्यापारांनी कर्ज काढलं आहे. बँकानी त्यांच्यासमोर पैशासाठी तगादा लावलाय आणि लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? असा सवाल उदयनराजेंनी सरकारला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- रेमडेसिव्हिर इंजेक्शन काय आमच्या घरी तयार होत नाही : छगन भुजबळ
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- छत्रपती उदयनराजे यांचे ‘कटोरा’ घेत लॉकडाऊन विरोधात आंदोलन


