Share

सातारचा एक खासदार कटोरा घेऊन रस्त्यावर, तर दुसरा गहू काढण्यासाठी थेट शेतात!

Published On: 

सातारा : लॉकडाऊन विरोधात राज्यभरात रोष व्यक्त होत असतांना राज्य शासनाने आणखी कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी तर चक्क कटोरा समोर घेत राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यक्तीवर कटोरा हातात घेण्याचीच वेळ आली असल्याचा आरोप या वेळी उदयनराजे यांनी केला आहे.

सातारामधील पोवई नाका परिसरातील छत्रपती उदयनराजे यांनी गोणपाट म्हणजेच पोत टाकत त्यावर ठिय्या मांडला. इतकच नाही तर समोर कटोरा देखील ठेवलाय. राज्य शासनावर होत असलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप लपवण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लावत असल्याचा आरोपही या वेळी उदयनराजे यांनी केला. वाझे प्रकरणातून भ्रष्ट्राचाराची नावे समोर आली आहेत. हा पैसा गरीबांना वाटायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

तर दुसरीकडे वीकेंड लॉकडाऊनमुळे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च्या शेतात गहू काढणीचे काम हाती घेतले. डोक्यावर पांढरी टोपी, पिळदार मिशी, अंगात पांढरा कुर्ता आणि जॅकेट असा पेहराव असलेले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं एक वेगळं आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना आपलं वाटणारं रुप आज पाहायला मिळालं.खासदार श्रीनिवास पाटील यांनी विकेंड लॉकडाऊनचा सदुपयोग करत थेट गव्हाच्या रानात पाय ठेवला. इतकच नाही तर हातात विळा घेत त्यांनी गहू काढणीला मदतही केली. त्यानंतर साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!