Share

जालना; विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांचे भाग्य उजळणार..

Published On: 

जालना: मागील कित्येक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांचा आता विकास होणार आहे.मागील काही वर्षांपासून ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते, त्यामुळे या रस्त्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. रस्ते चकाचक असतील तर ग्रामीण भागातील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न सुकर होऊन त्यांच्या विकासात व प्रगतीतदेखील वाढ होऊ शकते या हेतूने आमदार संतोष दानवे यांनी नुकताच भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. या निधीतून जवळजवळ २१. ४० किलोमीटर काम होणार आहे.

भोकरदन तालुक्यात यापूर्वी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली होती. महत्त्वाच्या रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडले असल्याने अपघाताच्या प्रमाणातदेखील वाढ झाली होती. महत्त्वाचे म्हणजे आजही अनेक भागात रस्ता खराब असल्या कारणाने लालपरीचे दर्शनदेखील नागरिकांना झालेले नाही. अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या रस्त्यांचे आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून भाग्य उजळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक भवितव्य रस्त्याअभावी धोक्यात आले होते. परंतु मागील काही वर्षांपासून आमदार संतोष दानवे यांनी रस्त्याचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. सध्या तालुक्यात युद्धपातळीवर ठिकठिकाणी रस्ते विकास कामे सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सोपा झाला आहे. आणखी नव्याने नुकताच ग्रामीण भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी आमदार संतोष दानवे यांनी मंजूर करुन घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!