परभणी : औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये जसा राष्ट्रध्वज उभारला आहे. तसेच वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर परभणी शहरामध्ये २०० फुटी राष्ट्रध्वज उभा करणार आहे. तसेच हा ध्वज मराठवाड्यामधील सर्वांत उंच ध्वज येणार आहे. आमदार डॉ. राहूल पाटील यांनी राजगोपालाचारी उद्यानामध्ये भेट दिल्यानंतर ही माहिती महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली आहे.
शहरातील राजगोपालाचारी उद्यानामध्ये संगीत कारंजे तसेच मनोरंजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार पाटील तसेच मनपाचे आयुक्त देविदास पवार तसेच मनपाचे अभियंते तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले, की जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा मनोरंजक प्रकल्प असणार आहे. दरम्यान पंधरा हजार फुटामध्ये राजगोपालाचारीमध्ये हा प्रकल्प साकारल्या जाणार आहे. या मध्ये मराठवाड्यामधील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे.
या बाबत नागरिकांची खुप वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार राजगोपालाची उद्यानामध्ये २०० फुटी राष्ट्रध्वज तसेच म्युझिकल कारंजे देखील उभारण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी जागेची नुकतीच पाहणी आमदार पाटील यांनी केली. यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी मंजुर केला आहे. या राष्ट्रध्वजावर रात्री प्रकाश सोडला जाणार आहे. रात्रीचे हे विशेष आकर्षण असणार आहे. या माध्यमातून परभणी जिल्ह्याच्या पर्यटनाच्या वाढीस महत्वाच्या असणार आहे.
पर्यटनवाढासाठी पुढाकार
परभणीकरांसाठी या सर्वांत उंच राष्ट्रध्वज हा कायम मनामध्ये राहणार आहे. पाण्याचे व्यवस्थित नियोजन करुन कांरज्यांला पाणी उपलब्ध करुन देणार आहे. जिल्हाचे पर्यटन वाढावे, महसूल वाढावा म्हणून आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. जो तरुण बाहेरगावी जात होता तो आता अश्या उद्यान उभारत आहोत.
– डॉ. राहुल पाटील, आमदार परभणी
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणारा गजाआड
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- सोमवारपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घ्या ; चंद्रकांत पाटीलांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महिला वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघ निवड
- बनावट कागदपत्राआधारे आरटीओ कार्यालयाची फसवणूक


