औरंंगाबाद : आरटीओ कार्यालयाने रिक्षा स्क्रॅप (भंगार) करण्याची परवानगी दिल्यावर बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून दोघांनी आरटीओ कार्यालयाची फसवणूक केली. आरटीओ कार्यालयाची फसवणू करण्यात आल्याचा हा प्रकार १० डिसेंबर २०२० ते २४ फेब्रुवारी २०२१ या काळात घडला असल्याची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी शुक्रवारी (दि.२६) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा.मकसुद कॉलनी, रोशनगेट) व अकबर (रा.औरंगाबाद) अशी आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणा-यांची नावे आहेत. शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल यांच्या मालकीची असलेली रिक्षा क्रमांक (एमएच-२०-बीटी-६४२०) स्क्रॅप (भंगार) करण्याचे आदेश रेल्वेस्टेशन येथील आरटीओ कार्यालयाने दिले होते. तसेच सदरची रिक्षा करोडी येथील आरटीओ कार्यालयात नेवून स्क्रॅप करण्याचे सांगितले होते. त्यावेळी अकबर नावाच्या व्यक्तीने शेख कमरोद्दीन यांची रिक्षा स्क्रॅप करण्यासाठी करोडी येथे न नेता, मोटार वाहन निरीक्षक रविंद्र नारळे यांच्या नावाचा बनावट शिक्का वापरून व त्यांची सही करून रिक्षा स्क्रॅप केल्याचा बनावट अहवाल तयार केला होता.
दरम्यान, आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रविंद्र नारळे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणा-या शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल व अकबर यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चित्रा ताई यांच्याविरुद्ध उघड षडयंत्र होतंय’
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- ‘बेजबाबदारपणे वागायला आम्ही संजय राठोड नाही’
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

