मुंबई : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगलामध्ये एकूण आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडेल. तर आठ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर २ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणूक कार्यक्रमांवर काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
If voting for Kerala-140, Tamil Nadu-234 and Puducherry-30 (total 404 seats) can be conducted in a single phase, why Assam-126 and West Bengal-294 (total 420 seats) require 7 & 8 phases?
Are there any nefarious plans??? #ELECTIONS2021 #ElectionCommissionOfIndia— Prithviraj Chavan (@prithvrj) February 26, 2021
चव्हाण म्हणतात की, केरळमध्ये १४० जागा, तामिळनाडूत २३४, पुडुचेरीच्या ३० जागा अशा एकूण ४०४ जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, आसाम १२६ आणि पश्चिम बंगाल २९४ अशा ४२० जागांसाठी सात ते आठ टप्प्यात का मतदान घेतले जाणार आहे? यामागे काही वेगळी योजना तर नाही ना असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
दरम्यान, तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजाची बदनामी थांबवा नाही अन्यथा आत्महत्या करेल’, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन


