Share

‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. राज्य पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असताना मात्र मृत पूजाच्या कुटुंबीयांनाही मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागत आहेत. काही माध्यमांच्या दाव्यानूसार पूजा आणि संजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. शिवाय राठोड यांनी पूजाला अनेक महागडे गिफ्ट्सही दिले होते.

यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत असे भावनिक आवाहन दियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

पोस्टमध्ये ती म्हणतेय की, ”वृत्तमाध्यमे सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पूजाच्या पोस्ट आहेत. त्या का नाही कोणी व्हायरल करत? जर त्या पुरूष असत्या तर त्यांच्यासोबतही नाव जोडले असते. माध्यमे ही काहीही मनघडन, त्यांच्या आवडीनूसार, काहीपण कॅप्शन देऊन वाटेल ते पूजाच्या नावाने खोटी माहिती प्रसारित करण्यासाठीत आहेत. प्रसार माध्यमातून सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणे पूजाला कोणाकडून गिफ्ट मिळाले आहेत. आणि ते कथित व्यक्तिकडूनच भेटले असा दावाही वृत्तवाहिन्या करत आहेत.

हे असे दररोज काहीतरी नवीन ऐकूण माध्यमांवरून विश्वास उडाला आहे. कोणाचे दु:ख कमी करू शकत नसाल तर कृपया हात जोडून विनंती आहे की त्यात भर तरी टाकू नका. हा त्रास आता दिवसेंदिवस असहनीय होत आहे. पूजा सुद्धा कोणाची तरी लेक किंवा कोणाची तरी बहिण आहे. अशा प्रकारची बदनामी करत आहात तुम्ही. आम्ही सहन तरी कशी करणार? माझ्या आई-वडिलांना काही व्हावे असे तुमची इच्छा आहे का? अनेकदा सर्वांना विनंतरी करूनही आमची बदनामी करणे थांबवत नाहीयेत. या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत…” असे भावनिक आवाहन तिने केले आहे.

दरम्यान, मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संजय राठोड यांच्यावर टीका करतानाच मीडियाला देखील एक विनंती केली आहे. पूजाचे पर्सनल फोटो प्रसारित केल्याने, आमच्या लेकींवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियाने पूजाचे पर्सनल फोटो दाखवणे बंद करावे, अशी विनंती रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!