🕒 1 min read
बीड : बीड नगर परिषदेने विविध शासकीय योजना अतिशय सक्षमपणे राबविल्या आहेत. किंबहुना कार्य करणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करताहेत. ते दोघे बीड, धारूर, गेवराई नगर परिषदेला लक्ष करत राजकीय द्वेषातून सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यान्वयन यंत्रणा म्हणून निर्देशित करत आहे. हे आदेश रद्द करावेत अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२०-२१ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक ०८ डिसेंबर २०२० नुसार जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत यांना अनु.जाती लोकसंख्येनिहाय निधी मंजूर करण्यात आला होता. सदरचा निधी नियमाप्रमाणे नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे संबंधित विकासकामांवरच खर्च करते. मागासवर्गीय वस्त्यांतून येथील नागरिकांनी व सन्मानीय सदस्यांनी आवश्यकतेनुसार नगर परिषदेकडे रस्ते, नाल्या व इतर प्रयोजनासाठी मागणी केल्यानंतरचा निधी मागणी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतो. ही शासकीय बाब असून यात कुठेही कुचराई किंवा दिरंगाई केली जात नाही.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समितीने निर्देशित केलेल्या कार्यान्वयन यंत्रणा रद्दबातल करून पहिलीच यंत्रणा पूर्ववत ठेवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक विष्णू वाघमारे, भीमराव वाघचौरे, पूजा वाघमारे, विकास जोगदंड, सखुबाई चांदणे, सीता भैयासाहेब मोरे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- ‘जयदत्त क्षीरसागरांनी धनजंय मुडेंवर टीका करू नये, अन्यथा..’
- रस्त्यावर तलवारीने केक कापने महागात, १३ जणांवर गुन्हा
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

