बीड : पूजाची बदनामी थांबवा नाही तर कुटुंबासह आम्हाला आत्महत्या करावी, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मृत पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांतून पूजाची रोज बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याविषयी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘दररोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप, फोटोग्राफ बदनामी करण्याच्या उद्देशाने येत आहेत. पूजाला न्याय मिळाला पाहिजे. पण कृपया तिची बदनामी मीडियाने, सोशल मीडियाने थांबवावी. पूजा ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होती. पण एकाच व्यक्तीसोबत तिचे फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. आमच्या घरामध्ये बहिणी, मुली आहेत. या सगळ्या रोजच्या बातम्या आणि फोटोमुळे होणारा त्रास आमच्या कुटुंबाला सहन होत नाही. पूजाला न्याय मिळाला पाहिजे मात्र राजकारण थांबवा’, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, पूजाची बहिण दिया चव्हाण हिनेही याप्रकरणी संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत असे भावनिक आवाहन दियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- आश्चर्यम! बीड जिल्ह्यात भाजपच्या मदतीला धावली शिवसेना
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

