Share

महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल

Published On: 

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. पुणे येथे खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. लिगल जस्टीस सोसायटीच्या वतीने लष्कर कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील वानवडी परिसरामधे पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. या प्रकरणी महिना होत आला तरी कोणताही तपास करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने हा खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नेमका का तपास केला नाही याचा अनुशंगाने तपासणी केली जावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश द्यावेत असेही या याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात लीगल जस्टीस सोसायटीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वानवडी पोलिसांकडे केली होती. गुन्हा दाखल न केल्यास त्यात खासगी खटला दाखल करू, असे देखील वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर लीगल सोसायटीच्या वतीने लष्कर न्यायालयात खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात सोशल मीडियावर व्हायरल झालेले ;ते’ संभाषण आणि इतर माहिती देऊन हा खटला सुरू करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!