मुंबई : राज्यात पुढील ३ ते ४ दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. केंद्र सरकारच्या वतीने निर्यात बंदी केल्यामुळे राज्याला इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही नवीन कंपन्यांनाही सरकारने मान्यता दिली असून त्या दृष्ट्रीकोणातून पुढील ३ ते ४ दिवसांत पुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच भाजपच्या वतीने एका कंपनीसोबत इंजेक्शन मागवण्याची बोलणी सुरू असतानाच पोलिसांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. या सर्वात राज्यातील राजकीय मंडळींचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या आरोप-प्रत्यारोपानंतही राज्यातील औषधांचा पुरवठा मात्र, अद्याप सुरळीत झालेला नव्हता.
आता मात्र, अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे स्वत: पुढे आले असून येत्या काही दिवसातच हा पुरवठा सुरळीत होवून सर्वांना मागणीनुसार औषधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही हॉस्पिटल विनाकारण अतिरीक्त रेमडेसिवीरचा वापर करत असून अशा हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- लष्करासाठी राखीव रुग्णालयात नाशिकच्या कोरोना रुग्णांना मिळणार उपचार- चंद्रकांत पाटील
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथं लागलाय’ ; बेजबाबदार नागरिकांचा फोटो शेअर करत हेमांगीने व्यक्त केला संताप
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या
- फडणवीसांच्या पुतण्याला कोरोना लस; जितेंद्र आव्हाडांची फक्त दोन शब्दांची प्रतिक्रिया !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

