मुंबई : देशात कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली वाढ पाहता केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या वतीने विविध उपाय केले जात आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर माठ्या प्रमाणात ताण आला आहे. यासाठी देखील अनेक उपाय केले जात आहेत. त्याचच एक भाग म्हणून आता देशभरात लष्करासाठी राखीव असलेल्या रुग्णालयात सामान्य कोरोना रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असे रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. त्यातच आता लष्कराच्या हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. देशभरातील सर्व लष्करी रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकमधील रुग्णालयाचाही समावेश असल्याने नाशिकमधील रुग्णांना दिलासा मिळेल.
लष्करासाठी राखीव असलेली ही आरोग्य यंत्रणा कोरोना काळात सर्व रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याने रुग्णांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळेल. तसेच राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी होईल. राज्यातील अनेक शहरांमध्ये अशी छोटी-मोठी रुग्णालये आहेत. त्या सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल. या निर्णयाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी राजनाथ सिंग यांचे आभार मानले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

