मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
परंतु, काही बेजबाबदार नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य अजूनही कळालेलं नाही. काही नागरिकांसाठी हा लॉकडाउन नसून उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर झाल्यासारखं वाटत आहे. अशाच काही बेजाबदार नागरिकांवर मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने संताप व्यक्त केला आहे.
सरकारने विनाकारण घराबाहेर पडू नका असं सांगितलं असलं तरीही घराच्या आवारात मिळून क्रिकेट खेळणाऱ्या काही बहाद्दरांची हेमांगीने शाळा घेतली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने त्यांच्यावर टीका केली आहे. तिने क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्यांचे फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘१) IPL पेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/4430033540349574
हेमांगीने या पोस्ट मधून नाराजगी व्यक्त केली आहे. हेमांगीने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली आहेत. ती उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

