मुंबई : सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास परवानगी असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लसीकरण करून घेतले आहे. वयोवर्षे ४५ च्या आतील असतानाही तन्मय फडणवीस याने लसीकरण केल्याच्या फोटोची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.
त्याने तो फोटो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. यामुळे त्याचे वय ४५ च्या पुढील नसताना, तो फ्रंट लाईन वर्कर नसतानाही त्याचे लसीकरण कसे झाले ? असे सवाल निर्माण होत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केवळ दोन शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतानाच लसीकरणाबाबत देखील भाजपकडून दुजाभाव होतोय का ? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच हा प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केवळ, ‘धन्यवाद तन्मय!’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, सोशल मीडियावर सध्या ‘चाचा विधायक है हमारे’ हे एका वेब सिरीज मधील वाक्य चांगलंच ट्रेंड होत आहे.
धन्यवाद तन्मय!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2021
देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण –
‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने मी माझ्या पत्नीला व मुलीलाही लस दिलेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलच पाहिजे असं माझं ठाम मत आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चाचा विधायक है हमारे,बडे परेशान रहते बेचारे; मिटकरींची फडणविसांवर टीका
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- शिवसेना आमचा ‘छोटा’ मित्र पक्ष होता, त्यांचं सरकार पडेल; शाहांनी शिवसेनेला डिवचलं !
- माजी मंत्री संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक, बुलढाण्यात तणाव वाढला
- संधी असुनही आंद्रे रसलने नाही केले जेमिसनला धावबाद; खरे कारण आले समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

