Share

हक्काचा पैसा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा

Published On: 

🕒 1 min read

जालना: अतिवृष्टीच्या पावसात जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वीमा कंपनीकडे अर्ज केले होते. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात ३८ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. पण अजूनही शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही.

दुष्काळ तसेच अतीवृष्टीच्या नैसर्गिक समस्या लक्षात घेऊन २०६-१७ मध्ये शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली होती. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये खरिपात विमा कंपनीकडे उसनवारी करून ऑनलाईन अर्ज केले होते. सोयाबीन, कपाशी, मका, तुर, मुग, उडीद अशा खरीप पिकांवर विम उतरवला होता. पण परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने दूर केला. तेव्हा शासनाने ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली होती. पण विमा कंपनी मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यास मागे पुढे बघत आहे.

खरीपात शेतातील विविध पिकांवर पाच हजार रुपयांचा पिक विमा उतरवला होता. मात्र अतिवृष्टीमुळे सगळेच धुवून निघाले यासाठी पिक विमा मंजूर होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागाकडे मागणी सुद्धा केली आहे. पण उडवाउडवीचे उत्तरे ऐकायला मिळत आहेत, दार वेळी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची हेळसांड होते, या कडे शासनाने लक्ष द्यावे, असे मत कैलास खंडेलवाल या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करावी यासाठी शासनाने देखील लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!