पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल (१७ मार्च) रोजी पुणे महापालिका हद्दीत तब्बल २५८७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात ७६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आत्तापर्यंत कोरोनाने ४ हजार ९८० रुग्णांचा बळी घेतला आहे.
काल दिवसभरात वाढलेल्या अडीच हजार रुग्णसंख्येनं प्रशासनानं हादरले आहे. आज महापौर, शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध काय असावेत, यावर चर्चा होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पुणे शहरात आजपासून कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 11 वाजता महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार आहे. तसंच अंमलबजावणीसाठीही कठोर पावलं उचलण्याचे आदेश महापौर देणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘जीन्स नाही तुमची बुद्धी फाटलेली आहे’, महुआ मोइत्रांची मुख्यमंत्री रावत यांच्यावर जोरदार टीका
- फोटो वरून बदनामीची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
- सत्तेत असतांना एक शब्दही न काढणाऱ्यांना आत्ताच भ्रष्टाचार का आठवत आहे? बागडेंंचा विरोधकांना सवाल
- अमृताने शेअर केला वीरचा फोटो, चाहते म्हणाले…
- दुचाकीवर बनावट क्रमांक, बेवारस अवस्थेत सोडली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

