लखनऊ : दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्धचा शेवटचा सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका महिला संघाने भारतीय महिला संघाचा ५ गडी राखुन पराभव केला. मात्र भारताने ही मालिका आधिच गमावली होती त्यामुळे शेवटचा सामना औपचारीकता म्हणून पुर्ण केला. मात्र या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाज मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी भारताकडून सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.
आखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटंकात १८८ धावा केल्या. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने आपले एकदिवसीय कारकीर्दीतील ५५वे अर्धशतक झळकावत ७९ धावा केल्या. मिताली राजने चौथ्या गड्यासाठी हरमनप्रित कौरसोबत ७१ धावांची भागिदारी केली. मात्र ३१व्या षटकांदरम्यान हरमनप्रीत दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाल्याने मैदानाबाहेर गेली.
मिताली राज व हरमनप्रीत कौर यांच्यात आतापर्यंत १४ वेळी ५० आणि त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. आज झालेल्या भागीदारीनंतर भारताकडून विक्रमी अर्धशतकी भागीदारी करणारी ही जोडी बनली आहे. महत्वाची बाब म्हणजे कर्णधार मिताली राजचा भारताकडून सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करणाऱ्या अव्वल-४ जोड्यांमध्ये समावेश आहे. मितालीने आतापर्यंत अंजुम चोपडा (१३), पूनम राऊत (१२) आणि स्मृती मानधना(११) सोबत अर्धशतकी भागीदारी केली आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी महिला एकदिवसीय सामन्यात १५०० षटके टाकणारी पहिली खेळाडू बनन्याचा किर्तीमान स्थापीत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात परिस्थिती हाताबाहेर ? महापौरांनी बोलावली तातडीची बैठक
- सोशल मीडियावर महिलेची बदनामी
- वनिता खरातचा बोल्ड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेचा विषय
- ‘जीन्स नाही तुमची बुद्धी फाटलेली आहे’, महुआ मोइत्रांची मुख्यमंत्री रावत यांच्यावर जोरदार टीका
- सत्तेत असतांना एक शब्दही न काढणाऱ्यांना आत्ताच भ्रष्टाचार का आठवत आहे? बागडेंंचा विरोधकांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

