Share

औरंगाबादेत वाढली गुन्हेगारी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाNया ट्रकने दिलेल्या धडकेत दोन दुचाकींचे नुकसान झाले. हा अपघात १६ मार्चला दुपारी तीन वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील देवळाई चौकात झाला होता. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार विलास साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक क्रमांक (जीजे-२५-यू-५५१८) चा चालक रविभाई विशाभाई मोरी (वय ३५, रा.द्रासनवेल, द्वारका, गुजरात) यांच्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण मटका खेळविणारा गजाआड
पैठण रोडवरील कांचनवाडी जवळ असलेल्या फरशीच्या कारखान्यालगत कल्याण मटका व श्रीदेवी मटका खेळविणाNया गजानन बबन दौंडकर (वय ३३, रा.नक्षत्रवाडी, सिंगलटन) याला पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई १६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून युवकास मारहाण
पूर्ववैमनस्यातून तीन जणांनी गणेश दशरथ आडसुळ (वय २०, रा.शिवाजीनगर) या युवकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १५ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विभागीय क्रीडा संवूâलाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ घडली. याप्रकरणी आकाश राजू मगर, सुरज मगर, राहुल खाडे, सर्व रा.शिवाजीनगर यांच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार ठोंबरे करीत आहेत.

पैशासाठी विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल
माहेराहुन २५ लाख रूपये आण असे म्हणत विवाहितेचा छळ करणाNया पतीसह सासरकडील चार जणांविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकीत बिमल अग्रवाल असे तक्रारदार महिलेच्या पतीचे नाव असून पीडितेच्या दिराला व्यवसाय करण्यासाठी नवीन शोरूम टाकायचे असून त्यासाठी २५ लाख रूपये आण म्हणून अवंâीत अग्रवाल हा जानेवारी २०१८ ते ८ ऑगस्ट २०२० या काळात पीडितेचा छळ करीत होता. पीडितेच्या तक्रारीवरून पती अंकीत बिमल अग्रवाल, सासरा बिमल परमेश्वर अग्रवाल, दिर अनुप बिमल अग्रवाल आणि सासूविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिता फासाटे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!