🕒 1 min read
नवी दिल्ली- उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नुकताच मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर ते एका नव्या वादात अडकले आहेत. रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
महिलाच्या कपड्यांसंदर्भात बोलताना रावत म्हणाले होते की, आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळं समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे.
‘मी एकदा जहाजातून प्रवास करत होतो, तेव्हा तिथे एक महिला आपल्या २ मुलांसोबत होती, आणि तिने फाटलेली जीन्स घातलेली. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा तिने सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. माझे पती JNU मध्ये प्राध्यापक आहेत, आणि मी एक NGO चालवते.‘तेव्हा मी विचार केला की, जर NGO चालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल?
तीरथ सिंह म्हणाले की, आजकाल फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले.
Uttarakhand CM :
“Jabh nichey dekha toh gumboot the.. aur upar dekha toh …. NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”CM saab- jabh apko dekha toh upar neeche aagey peechey humein sirf besharm behuda aadmi dikhta hai
State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा यांनीही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.महुआ मोइत्रा यांनी रावत यांच्यावर टीका केली आहे.राज्य चलाते हो और दिमाग फटे दिखते है’ असं म्हणत ‘जीन्स नाही बुद्धी फाटलेली आहे’, अशी टीका मोइत्रा यांनी मुख्यमंत्री रावत यांच्यावर केलीय.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
