Share

सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे

Published On: 

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील गावांना निरा डावा कालव्यातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या बातमीमुळे सोलापुरकरांमधून संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणात शनिवारी संध्याकाळी प्रतीकात्मक आंदोलन केलं. इंदापूरकरांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी सोलापूर जिल्हावासीयांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.

दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली असल्याचं संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. कोरोना संदर्भातील आढावा बैठकीसाठी ते काल सोलापूर येथे आले असता बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

इंदापूरला जाणारं पाणी हे बॅक वॉटरमधील सांडपाणी आहे, त्याचा आणि सोलापूरच्या हक्काच्या पाण्याचा तसा काहीच संबध नाही. उजनीच्या पाणी वाटपाचा कोटा पुर्ण झालेला आहे. त्यामुळे आता जलाशयातून इतरांना पाणी देणं शक्य नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

सध्या कोरोनामुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठं संकट आलं आहे त्याचं निवारण करण्यासाठी जिल्हयातील यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. त्यामुळे लोकांनी आता अशा अफवांवर लक्ष देवू नये असंही भरणे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!