🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील दररोज दोन ते तीन हजार रुग्णांची भर पडत असून शहरातील स्थिती बिकट होत आहे. अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय शोधताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, वाढत्या कोरोनाच गांभीर्य अजूनही नेत्यांना समजलंच नसल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती भयंकर झाल्याने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्यात आला आहे.
अनेकांना आपला रोजगार बुडवून प्राण वाचवण्यासाठी नियमांचं पालन करून घरी बसावं लागत आहे. अशातच, पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णालयांना भेटी देण्यासह कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यापासूनच राज्यात धार्मिक, राजकीय, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना नियमांना केराची टोपली दाखवून हा कार्यक्रम पार पडला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला उपदेशाचे डोस पाजून कोरोनाच्या भयानक स्थितीच खापर फोडणाऱ्या भाजपा नेत्यांना वेगळा न्याय आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. सामन्यांप्रमाणेच या नेत्यांना कडक शासन केलं जाईल का ? शुल्लक दंड भरून हे नेते यातून मोकळे देखील होतील, मात्र लोकप्रतिनिधींचे वर्तनच असे असेल तर जनतेकडून काय अपेक्षा करणार ? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- शरद पवारांच्या आवाहनाला ‘या’ कारखान्याचा प्रतिसाद; सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती
- १८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य; नोंदणी कशी करणार ? घ्या जाणून
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
