अहमदाबाद : गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे. यात, लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा एकदा भारतात कोरोना संसर्ग बळावला असून पहिल्या लाटेतून अधिक मोठी समस्या निर्माण होत आहे. बेड्स, ऑक्सिजन, विविध औषधे मिळत नसल्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे.
या रोगामुळे अनेकांनी आपले वडील, आई, भाऊ, ताई, आजी, आजोबा असे नातलग गमावले आहेत. कुटुंबांचा आधारच कोरोनाने हिरवल्यामुळे कित्येक कुटुंबांसमोर भविष्याचा, सध्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, सुरतच्या एका दाम्पत्याने हाताशी आलेला आपला मुलगा कोरोनामुळे गमावला. खरं तर वयात आलेले तरुण मुलं-मुली हेच आई-वडिलांसाठी आधार ठरत असतात.
मात्र, या दाम्पत्याचा आधारच गेल्यामुळे मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरून त्यांनी जे सामाजिक कार्य केलं आहे ते अनेकांना बळ देऊन जाईल. ज्या मुलाच्या भविष्यासाठी पैसा जमवला होता तोच गेल्यानंतर या दाम्पत्याने साठवलेले पैसे गरजूंसाठी देण्यास सुरुवात केली आहे. रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं त्यांचं नाव आहे.
मेहता दाम्पत्याने मुलाच्या उज्वल भविष्यासाठी १५ लाख रुपये जमा करून FD केली होती. आता मुलगा गमावल्यानंतर अशी वेळ इतर कोणत्या कुटुंबावर येऊ नये म्हणून ते पुढे सरसावले आहेत. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यासोबतच आतापर्यन्त त्यानो २०० पेक्षा अधिक रुग्णांना आयसोलेशन किट व इतर साहित्याचं वाटप केलं आहे. इतकंच नाही तर कोरोनापासून बचाव होण्यासाठी ३५० हुन अधिक नागरिकांचं लसीकरण देखील त्यांनी स्वखर्चातून केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोनाची दांडी ? ज्ञान पाजळणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई होणार का ?
- १८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य; नोंदणी कशी करणार ? घ्या जाणून
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल


