अहमदनगर : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत आहे. पण इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने यावरून राज्यात चांगलाच वाद झाला होता. रेमडेसिवीरच्या साठ्यावरून भाजपवर टीका होत असतानाच अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले आहेत. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. पण त्याचवेळी मुंबईत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गुजरातमधून आणलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून वाद सुरू होता. त्यामुळे त्यावेळी विखे यांनी आपण कोठून आणि नेमकी किती इंजेक्शन्स आणली हे सांगणे टाळले होते.
मात्र आता सुजय विखे यांनी नक्की रेमडेसिव्हिर आणले की नाहीत यावरून वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुजय विखेंवर संशय व्यक्त केला आहे. ‘खा. सुजय विखे यांच्या एकंदरीत हालचाली संशय निर्माण करणाऱ्या आहेत. कुणाला कानोकान खबर न करता दिल्लीला जाणे, तेथून रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली भरलेले बॉक्स आणणे, दोन दिवसानंतर सोशल मीडियामध्ये वैयक्तिक विमान प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल करणे. काहीतरी गडबड नक्कीच आहे.’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
खा. सुजय विखे यांच्या एकंदरीत हालचाली संशय निर्माण करणाऱ्या आहेत. कुणाला कानोकान खबर न करता दिल्लीला जाणे, तेथून रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली भरलेले बॉक्स आणणे, दोन दिवसानंतर सोशल मीडियामध्ये वैयक्तिक विमान प्रवासाचा vdo व्हायरल करणे. काहीतरी गडबड नक्कीच आहे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 25, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोनाची दांडी ? ज्ञान पाजळणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई होणार का ?
- ज्याच्यासाठी कमावलं तोच कोरोनाने हिरावला; वृद्ध दाम्पत्य FD मोडून करतंय कोरोना रुग्णांना मदत
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल


