Share

दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वी विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे रुग्णांचा नाहक बळी जात असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक विधान केले होते.

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असे वक्तव्य राजेश टोपेंनी केलं आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय. घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, ‘आपण रेमडेसीवीर, ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल’, असं भाष्य टोपेंनी केलं होतं.

राजेश टोपेंच्या या विधानाचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आता, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील टोपेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘वसई-विरार मध्ये रूग्णालयाला आग लागल्याने १४ रूग्णांचा मृत्यू झाला ही अतिशय क्लेशदायक बातमी आहे. मात्र, अशा घटना घडल्यावर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही. एखादी बातमी ही महत्वपूर्ण व राष्ट्रीय बातमी होण्यासाठी अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इच्छा होती का?,’ असा संतप्त सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!