मुंबई: इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. याच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र अशातच आता कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक महत्वाचा सल्ला दिला आहे. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने कर कपात करुन जनेतेला दिसाला दिला तसा राज्य सरकारनेही द्यावा अशी भाजपाकडून मागणी केली जात आहे. वास्तविक पाहता केंद्राकडून आकड्यांचा खेळ करुन दिलासा दिल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु यातून राज्य सरकारचा हिस्सा कमी होत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. पंजाब व राजस्थानमध्ये इंधनावरील कर कपात करून जनतेला जसा दिलासा दिला आहे त्याच प्रकारे आता महाराष्ट्राने देखील करावं, असा सल्ला पटोले यांनी दिला आहे.
केंद्र सरकारवर टीका करताना पटोले म्हणाले, सेसमधला हिस्सा राज्याला मिळत नाही त्यामुळे उत्पादन शुल्क कपात केल्याने राज्याला मिळणारा हिस्साचा कमी झाला आहे. १ मार्च २०२१ पासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्कातून मिळणारे राज्य शासनाचे जवळपास ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारने हडप केले आहेत. केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेचे आणि राज्य सरकारांचेही आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- केंद्र सरकारने राज्याचे ३० हजार कोटी हडपले; नाना पटोलेंचा आरोप
- ‘शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर आले हेच कळत नाही’
- सरकार कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा, सेवा समाप्तीच्या धमक्या देतंय- गोपीचंद पडळकर
- ‘आधी क्रांतीकारकांचा अपमान, आता महात्मा गांधीवर टीका, यासाठीच पद्मश्री मिळाला का?’
- एनसीबीच्या चौकशीनंतर अनन्याने पहिल्यांदाच शेअर केली अनोखी पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

