मुंबई : मुंबईतील क्रूझवरील अं’मली पदार्थ प्रकरणी चौकशीनंतर अभिनेत्री अनन्या पांडे ही इंस्टाग्रामपासून पूर्णपणे दूर होती. मात्र एनसीबीच्या चौकशीनंतर तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केले आहे.
अनन्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एनसीबीच्या चौकशीनंतर अनन्या काही काळ सोशल मीडियापासून दूर होती. आता या वादानंतर ती पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर परतली आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कारच्या आत बसून इंद्रधनुष्य कॅप्चर करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “थोड्या पावसाशिवाय तुमच्याकडे इंद्रधनुष्य असू शकत नाही. हे पाहा.”
https://www.instagram.com/tv/CWUoOMzjfGN/?utm_medium=copy_link
हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला आहे, याबाबत अनन्याने माहिती दिलेली नाही. या सुंदर व्हिडिओमध्ये अनन्याच्या हसऱ्या चेहऱ्यापासून ते कारबाहेरील दूरवरच्या निसर्गात आकाशातील इंद्रधनुष्याच्या दृश्यापर्यंत कॅमेरा कॅप्चर करतो. बाहेर हिरवळ आहे आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य उगवला आहे. या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि कमेंटही करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

