Share

केंद्र सरकारने राज्याचे ३० हजार कोटी हडपले; नाना पटोलेंचा आरोप

Published On: 

मुंबई: केंद्र सरकारने ३ नोव्हेंबरला केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कमी केलेत. पण दुसरीकडे सेस लावून लोकांची लूट सुरूच आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे राज्यांना मिळणारा यातला वाटा कमी होणार असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, १ मार्च २०२१ पासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्कातून मिळणारे राज्य शासनाचे जवळपास ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारने हडप केले आहेत. केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेचे आणि राज्य सरकारांचेही आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लावला आहे. ते पुढे म्हणाले, सेसमधला हिस्सा राज्याला मिळत नाही त्यामुळे उत्पादन शुल्क कपात केल्याने राज्याला मिळणारा हिस्साचा कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे कमी झालेले दर पाहता पेट्रोल ६० रुपये लिटर असायला हवे होते. मात्र कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असतानाही देशात पेट्रोल ११० रुपये आणि डिझेल १०० रुपये प्रति लिटर एवढ्या चढ्या दराने विकून मोदी सरकार जनतेची लूट करत आहे. महागाईच्या काळात जनतेला दिलासा देण्या ऐवजी केंद्र सरकार जनतेला आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनवत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!