Share

सत्तेअभावी भाजपाची अवस्था म्हणजे ‘जल बिन मछली’; नाना पटोलेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. यामुळेच भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.

मंदिर उघडावीत या मागणीसाठी भाजपा आता आक्रमक झाली आहेत. ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन केलं आहे. सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार, हॉटेल, मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. तर या आंदोलनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे.

‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप हा कासावीस झाला आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काहीही प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचे काही देणंघेण नाही’, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!