Share

मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड

Published On: 

यवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने धाड टाकली आहे. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत.

भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.

ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला. परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे.
या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, ४३ कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!