Share

‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Published On: 

नाशिक : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरीच नव्हे तर संपूर्ण जनता वेठीस आली आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी कायदे केले त्यांनाच विश्वासात घेतले नाही. त्यावर चर्चा केली नाही. ज्यांनी विरोध केला त्या खासदारांना निलंबित करण्यात आले. हे कायदे भांडवलदार यांच्यासाठी उपयोगी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. उलट मोदी आणि शहा हे देशाची विक्री करत असून अंबानी आणि अदाणी हे खरेदी करत असल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्र सरकारच्या शेतकरी कायदे आणि प्रीपेड वीज बिल विधेयका विरोधात दिल्ली येथे लढा देत असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ विविध शेतकरी संघटनांच्या वतीने नाशिक रोड येथे शेतकरी जनजागृती परिषदेसह ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी थोरात म्हणाले की, केंद्रामध्ये जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून रेल्वे, एलआयसी, विमानतळे आणि रिझर्व्ह बँकेचे खासगीकरण सुरू केले असून देशाला फक्त भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे. दिल्लीमध्ये हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते समजत नाही. जेव्हा चिमटा बसेल तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना समजेल असा टोला त्यांनी लगावला.

मोदी सरकारला बाजार समिती नको आहे. त्यामुळे सर्वच बंधनांतून मोकळे करत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्या व्यापाऱ्यांना पाच वर्षे तुरुंगात जावे लागणार आहे. त्यादृष्टीने कायदा तयार करण्यात येत असल्याचे थोरात यांनी सांगितले. केंद्राने भांडवलदारांच्या आर्थिक लाभासाठी अगोदर गोदामे तयार केली. त्यानंतर हे काळे कायदे तयार करण्यात आल्याचा आरोप महसूलमंत्री थोरात यांनी केला. मोदी आणि शहा हे शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपचा भ्रम तयार झालाय की लोक आम्हालाच मतदान करत आहे असेही थोरात म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!