सांगली : आरेवाडीतील बिरोबा देवस्थान जागृत आहे. बिरोबाचा आशीर्वाद घेतल्यावर अनेक गोष्टी चांगल्या देखील होतात. पण बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना सणसणीत टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांनी बिरोबा देवाच्या घेतलेल्या शपथेची आठवण करून देत पाटील यांनी पडळकरांकवर अप्रत्यक्षन निशाणा साधला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढालगाव वितरिकेच्या कामाची पाहणी व जलपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी खासदार संजय पाटील म्हणाले, आमदार सुमनताई पाटील आदी उपस्थित होते. आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी लाखो भक्त येतात. या बिरोबा देवस्थानाच्या विकासासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांचा प्रस्तावित निधी तातडीने मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर मुंबई येथे बैठक आयोजित करुन हा निधी मिळवू, असे आश्वासनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, चंद्रका़त पाटील यांचा हा सल्ला निराशेतून आलेला आहे. गेले काही महिने हे सतत सरकार जाईल, अशी वक्तव्ये करत होते. मात्र, सरकार भक्कम असल्याचे आता लोकांच्याही लक्षात आले आहे.
सरकार स्थिर असल्याने अधिकारी विरोधकांचे ऐकत नाहीत. यातून आलेल्या निराशेतूनच ते अधिकाऱ्यांवर राग व्यक्त करीत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या परस्परविरोधी विधानांमधून त्यांची निराशा स्पष्ट दिसत आहे, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर


