Share

‘गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू’, राष्ट्रवादीचा आरोप

Published On: 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात  एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती.

तर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भुजबळ आणि खडसे यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. सांगलीत ते म्हणाले, ‘भाजप विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा वापर करीत आहे, हे लपून राहिलेले नाही. गेली चार-पाच वर्षे ही पद्धत सुरू आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!