🕒 1 min read
मुंबई : विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी नीतेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अतिशय बोचऱ्या शब्दांमध्ये नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र डागलेले आहे.
सभागृहात राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना नीतेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला.
तसेच ‘गुन्हेगारांची हिंमत का वाढतेच याचा विचार व्हायला हवा. गेल्या दीड वर्षांत एक कवच तयार झालंय. मंत्री अडचणीत सापडला की यंत्रणा कामाला लागते,’ अशी टीका नीतेश राणेंनी केली.
एखादं प्रकरण पद्धतशीरपणे कसं लपवायचं याचा ट्रेनिंग कॅम्प हे सुरू करतील. म्हणजे उद्या काही त्रास नाही. गायकवाड ताईंना सांगितलं पाहिजे याचीही एक शाळा सुरू करा, असा टोलाही नीतेश राणे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप-मनसे युती होणार ?, गिरीश महाजन यांची मोठी प्रतिक्रिया
- माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे.
- संपत्तीसाठी जन्मदात्याला जिवे मारण्याचा प्रयत्न
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
