Share

संपत्तीसाठी जन्मदात्याला जिवे मारण्याचा प्रयत्न

Published On: 

औरंंगाबाद : संपत्तीसाठी पोटच्या मुलाने दुस-या पत्नीच्या मदतीने जन्मदात्या वडीलांना विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगाव-शेणपुंजी येथील एकतानगरात घडली आहे. अविनाश गौतम वाठोरे (रा.एकतानगर, कृष्णानगर, रांजणगाव-शेणपुंजी) असे वडीलांना विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या मुलाचे नाव आहे.

गौतम वाठोरे (वय ५२, रा.एकतानगर,कृष्णानगर रांजणगाव-शेणपुंजी) यांनी बारा बाय तीस फुटाचा प्लॉट घेवून त्यावर दोन मजली घर बांधले असून सदरील घरात मोठा मुलगा अविनाश वाठोरे हा दुस-या पत्नीसह राहतो. तर गौतम वाठोरे हे पत्नी इंदुबाई गौतम वाठोरे, आकाश गौतम वाठोरे, अंकुश गौतम वाठोरे हे दुसरीकडे राहतात राहतात. आपल्या घरात राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून वाठोरे दांम्पत्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अविनाश वाठोरे याला बोलावून तंबी देत वाठोरे दांम्पत्याला त्यांच्या घरात ठेवले होते.

घटनेच्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आलेल्या अविनाश वाठोरे याने घर खाली करा असे म्हणत आपले वडील गौतम वाठोरे यांना विष पाजले, तर त्याची दुसरी पत्नी सीमा हिने इंदुबाई वाठोरे यांना पकडून ठेवले होते. इंदुबाई वाठोरे यांनी या घटनेची माहिती अविनाश वाठोरे याची पहिली पत्नी मंदाकिनी वाठोरे हिला कळविल्यानंतर मंदाकिनी वाठोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून गौतम वाठोेरे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!