नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मधील बड्या नेत्यानं हॉटेलमध्ये जाऊन राज यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर शनिवारी सकाळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे राज यांच्या भेटीसाठी पोहोचले. पालवे यांनी राज यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. पालवे यांच्या भेटीमुळे नाशकात मनसे आणि भाजप एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु झाल्यानंतर आता यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहे. पण, आगामी निवडणुकांसाठी मात्र मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही’, असं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण, तरी माहूर तहानलेलेच!
- माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे.
- संपत्तीसाठी जन्मदात्याला जिवे मारण्याचा प्रयत्न
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

