Share

‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीला नातेवाईक धावून जात त्यांच्या छातीवर दाब टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ऑक्सिजन अभावी रुग्णांनी प्राण सोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे व गंभीर असल्याने देशाच्या पंतप्रधानांपासून ते इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लक्ष्य केलं आहे. ‘ऑक्सीजन गळतीमुळे २२ रुग्णांचे तडफडून मृत्यू झालेले असताना आरोग्यमंत्र्यांना मात्र ऑक्सिजन गळती लगेच थांबवल्यामुळे ऑक्सिजन फार वाया गेला नाही ही “मायनर” अर्थात किरकोळ घटना वाटते. राज्याचा आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो? या दुर्घटनेतील मृत हे सरकारच्या नियोजन शून्य, बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराचे बळी आहेत,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!