Share

माझी मम्मी तडफडून मेली हो…;रुग्णालयात लेकीचा हृदयद्रावक आक्रोश

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : ‘माझी मम्मी क्लीअर झाली होती. फार चांगली होती. जेवण करत होती. अर्ध्या तासापूर्वी ऑक्सिजन संपला, व्हेंटिलेटर बंद पडला , फडफड कोंबडीवाणी मेली ती फडफडून. कुणी नाही आलं तिच्याजवळ, मरुन गेली, फक्त माझी मम्मीच नाही, सगळे मेले, पूर्ण वार्डचे लोकं मेले’, हा आक्रोश आहे एका लेकीचा. संपूर्ण महाराष्ट्रच हृदय पिळवटून टाकेल असा आक्रोश आज दुपारपासून नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात पाहायला मिळत आहे.

ऑक्सिजन अभावी आपली आई गमावणाऱ्या तरुणीनं तिचा आक्रोश, संताप व्यक्त केला. ‘दोन-दोन दिवस हे लोक वेटिंगवर ठेवतात. हे हॉटेल आहे का की वेटिंगवर ठेवायला? दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर होती. तेव्हा हॉस्पिटलने रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी अॅडमिट करून घेतलं. त्याआधी दोन दिवस वेटिंगवर राहा, मग आम्ही तुमचं प्रोसिजर करु, असं सांगितलं होतं. जसं आम्ही यांच्याकडे नोकरी मागायला आलो आहोत’, अशा शब्दांत तरुणीनं रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकाराला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

जीवाच्या आकांताने आक्रोश करुन अनेक नातेवाईक त्याचं दुख: व्यक्त करत होते. रुग्णालयाबाहेर मृत नातेवाईकांचा आक्रोशाचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा आहे. अशावेळी बाधित कुटुंबांना सावरायचं कसं? त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!