Share

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या रेल्वेचा खोळंबा, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राज्याला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आयात करण्यासाठी स्पेशल रेल्वे तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचा कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

परंतु या ऑक्सिजन रेल्वेबाबत केंद्र सरकार जाणूनबुजून राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. ‘देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण खेळत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने अजूनही फिरवत ठेवले आहे,’ असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला.

अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस 19 तारखेला निघाली तरी अजून काल रात्री 24 तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करुन दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही क्रूर आणि कपटनीती आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!