🕒 1 min read
लातूर: कोरोना महामारीत अहोरात्र काम करणाऱ्या अरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग-३ आणि वर्ग-४ पदावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासन कायम स्वरुपी सेवेत घेणार आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड महामारीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येई पर्यंत हा निर्णय घेण्याचा विचार राज्य शासन करीत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले.
कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने गेल्या काही वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्ग-३ आणि वर्ग-४ पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत. अशा कंत्राटी कार्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या भरती दरम्यान या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेता येईल का, याबाबत शक्यता तपासून घेण्यात येणार आहे तसेच यापूर्वी सुद्धा वित्त विभागाकडे याबाबत अभिप्राय मागविण्यात आले होते, परंतु कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून खबरदारी म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असे यावेळी देशमुख म्हणाले.
या निर्णयमुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वर्ग-३ आणि वर्ग-४ पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्या संदर्भातील बैठक आज मंत्रालयात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आ. आजगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोड आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर उपासमाची वेळ, दुकाने सुरु करण्याची मागणी
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- त्रिमूर्ती चौकातील ‘त्या’ झोपडीवर अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा, आजीबाई झाल्या बेघर!


