Share

त्रिमूर्ती चौकातील ‘त्या’ झोपडीवर अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा, आजीबाई झाल्या बेघर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला शहर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा प्लॉटिंगची आठवण झाली आहे. बुधवारी नारेगाव परिसरातील बेकायदा प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली. तसेच त्रिमूर्ती चौकातील गेल्या कित्येक वर्षांपासून असलेले झोपडीवजा अतिक्रमण देखील पाडण्यात आले. याठिकाणी राहत असलेल्या आजीबाई मात्र निराधार झाल्या आहेत.

शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे प्लॉटिंग बनवणे सुरू आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातर्फे अधून-मधून कारवाया केल्या जातात. मात्र पथक मागे फिरतात भूखंड माफियांचे काम पूर्ववत सुरू होते. कारवाई केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची तसदी प्रशासन घेत नाही. त्यामुळे शहर परिसरात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक सुरू आहे.

नारेगाव परिसरात केंब्रिज शाळा रस्त्यालगत गट क्रमांक सहा व सात मध्ये बेकायदा प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली. व जमिनीचे सपाटीकरण करून त्यात फ्लाॅटिंग टाकून सिमेंटचे पिवळे खांब लावण्यात आले होते. पथकाने ते खरडून काढले. मात्र ही प्लॉटिंग कोणी टाकले याची माहिती पथकाला मिळू शकली नाही. तसेच त्रिमूर्ती चौकात रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

एका वृद्ध महिलेने १० बाय १२ आकाराची झोपडी बनवून त्याशेजारी दगड कचरा जमा केला होता. हे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. या कारवाईत अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, मझहर अली, पी.बी. गवळी, सागर श्रेष्ट यांच्यासह पोलीस पथकाने केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!