मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.
दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागली होती. दरम्यान, याकाळात अनेक नव्या तारखा, बैठका यांच्या चर्चा सुरु होत्या. आता, राज्य सरकार मुंबईकरांना नव्या वर्षाची भेट देणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘सर्वांसाठी लोकल प्रवास हा नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच सुरु केला जाईल,’ असं विधान केलं आहे. अद्याप त्याची नेमकी तारीख सांगितली नसली तरी पहिल्या आठवड्यातच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात?’
- ‘मेटेंना सामान्य ज्ञान हवं; मागासवर्गीयांसाठी पुढाकार घेणं म्हणजे इतरांना विरोध असं नाही’
- …नाहीतर विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- कोरोना फक्त रात्रीचाच असतो का? असं विचारणाऱ्यांची मला कीव येते; परबांचा मनसेला खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
