🕒 1 min read
नाशिक : इंधन दरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही इंधनावरील दराबाबद मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर देवेंद्र फडणविसांनी माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.
राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली, दीड रुपयांनी दर कमी केला म्हणजे थट्टा. बाकीच्या राज्यांनी 7 ते 15 रुपयांपर्यंत दर कमी केला. महाराष्ट्र हे तर सर्वाधिक समृद्ध राज्य, देशाच्या 15 टक्के जीडीपी फक्त महाराष्ट्राचा, केंद्राने 2 लाख 20 हजार कोटीचे नुकसान सहन केले आहे आणि आपण 2500 कोटीचे नुकसान सांगतो. किमान केंद्राने जेवढी कपात केली त्याच्या 10 टक्के तरी करायला हवी होती, असे मत देवेंद्र फडणविसांनी मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
