Share

‘कॅ.अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपात प्राण फुंकण्याचे राजकारण त्यांच्यावरच उलटेल’, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

मुंबई: पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कॅ.अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे राजकारण त्यांच्यावर उलटेलच,पण सीमेवरचे आणखी एक राज्य ते अकारण तणावग्रस्त करतील.पंजाबचा असा गोंधळात गोंधळ करणे देशासाठी धोकादायक ठरेल. कॅ. अमरिंदर यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करायला लावून काँग्रेसच्या मतांचे विभाजन करायचे व आपली पोळी भाजायची हा भाजपचा डाव असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

पंजाबचे ‘पायउतार’ मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांनी आता नव्या पक्षाची घोषणा केली आहे. कॅ. अमरिंदर हे कालपर्यंत काँग्रेस पक्षाचे पंजाबातील महत्त्वाचे शिलेदार होते. अनेक वर्षे ते काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा लाभ घेत आहेत. भोगी व ऐयाशी अशी त्यांची प्रतिमा असतानाही काँग्रेसने त्यांना अनेक वर्षे सांभाळले. काँग्रेस पक्षातच त्यांच्या विरोधात नाराजी झाली, आमदारांत बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात एकही आमदार त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. कॅ. अमरिंदर पदावरून जातील तेवढे बरे, असेच प्रत्येकाला वाटत होते व अखेर ‘पतियाळा महाराज’ म्हणजे कॅ. अमरिंदर यांचा राजीनामा राहुल गांधींनी घेतला. यात त्यांचा असा काय अपमान झाला?असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

आपला अपमान झाला असे म्हणत त्यांनी जो भांगडा सुरू केला, त्या भांगडय़ामागचे ढोलवादक अर्थात भारतीय जनता पक्षाचे कलाकार होते हे आता स्पष्ट झाले. कॅ. अमरिंदर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली व शेतकऱ्यांचे वगैरे प्रश्न सोडवले तर आपला पक्ष भाजपबरोबर युती करील, असे त्यांनी सांगितले आहे. हा गमतीचाच भाग आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा हे महाशय शेतकऱ्यांच्या प्रश्नी ठाम भूमिका घेऊन उभे राहिलेले कधी दिसले नाहीत. हे महाशय आपल्या फार्म हाऊसमध्येच स्वतःला कोंडून घेत. तेथे आमदार, मंत्री, अधिकाऱ्यांना येण्यासाठी मज्जाव होता. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते. आता त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे व त्यासाठी ते भाजपशी हातमिळवणी करायला तयार झाले. मुळात शेतकऱ्यांना चिरडून मारणारे, शेतकरी खतम करणारे भाजपचे शासनकर्तेच आहेत. एक वर्षापासून शेतकरी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांचे रक्त शोषण्याचेच काम या काळात झाले. हरयाणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निर्घृण हल्ले झाले व खट्टर यांच्या प्रेरणेने शेतकऱ्यांची डोकी फोडली गेली. तेव्हा कॅ. अमरिंदर यांना शेतकऱ्यांविषयी उमाळा आला असे दिसले नाही व त्याच भाजपशी हातमिळवणी करून कॅ. अमरिंदर पंजाबात निवडणुका लढवायला निघाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!