मुंबई – सर्व गरीब गरजू आणि मध्यमवर्गीयांनाही मोफत लस द्यावी. ज्यांना पैसे देणे शक्य आहे अशा लोकांकडून लस साठी पैसे घ्यावेत. त्या पैश्यांचा उपयोग गरिबांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी करता येईल. सर्व कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या गरिबांना,गरजू मध्यम वर्गीयांना लस मोफत द्यावी.प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.प्रत्येकाला लस घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व गरीब आणि मध्यमवर्गीयांना लस मोफत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आणि भिन्न विचारांचे असल्याने त्यांच्यात ताळमेळ नाही. निर्णय घेण्यात दिरंगाई करणारे महाराष्ट्राच्या नशिबी आलेले मविआचे सरकार आहे. सर्व गरीब आणि गरजू मध्यम वर्गीयांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा. त्यासाठी राज्य सरकार च्या बजेट मधून अधिकाधिक निधी ची तरतूद करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात सरसकट लोकांना लस मोफत द्यायची का याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तसेच मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांची आहे.
राज्यात वय वर्ष 18 ते 45 मध्ये पाच कोटी नागरिक येतात. याचा अर्थ या नागरिकांना 10 कोटी लसींचे डोस लागणार आहेत. सरसकट सगळ्यांना लस मोफत द्यायची झाली तर साधारण राज्य सरकारवर चार हजार कोटींचा भार येऊ शकतो. त्यामुळे सरसकट लस सगळ्यांना मोफत देण्याऐवजी गरिबांनाच लस मोफत द्यावी, ज्यांना परवडत त्यांनी पैसे देऊन घ्यावी असेही काही मंत्र्यांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या भीषण परिस्थितीत भारताच्या मदतीला ‘हे’ देश आले धावून; जगभरातून सुरु झाला मदतीचा ओघ
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी कशी कराल ? जाणून घ्या सोपी प्रक्रिया


