🕒 1 min read
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदेशनीती सध्या कमाल दाखवत असून जगभरातून भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आता पुढे येवू लागले आहेत. देशातल्या वाढत्या कोरोना संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी भारताला आता जगभरातील अनेक देशांकडून वैद्यकीय मदत मिळत आहे. त्यानुसार भारताच्या मदतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत युरोपियन संघ संघटनेतील अनेक युरोपातील देशांनी भारताला वैद्यकीय मदत जाहीर केली आहे.
या अंतर्गत आयर्लंड 700 ऑक्सिजन निर्मिती यंत्र, एक ऑक्सिजन जनरेटर आणि 365 व्हेनटीलेटर्स देणार आहे. तर बेल्जीयमम्कडून 9 हजार रेमडेसिवीरच्या कुप्या, रोमानिया कडून 80० ऑक्सिजन कॉनसट्रीटर आणि 45 ऑक्सिजन सिलेंडर, लक्समबर्ग कडून 58 व्हेनटीलेटर्स, स्वीडन कडून 120 व्हेनटीलेटर्स, तर पोर्तुगाल कडून दर आठवड्याला 20 हजार लिटर ऑक्सिजन आणि 5503 रेमडेसिवीरच्या कुप्या देण्यात येणार आहेत.
भारतात गेल्या 6 दिवसापासून दररोज 3 लाखाच्या वर कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉर्न डेर लेयन यांनी भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या गंभीर संकटात युरोपीय युनियन एकजूटपणे भारताच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याच सांगितल.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता भारताला ब्रिटनची देखील साथ मिळत असून ब्रिटनने 100 व्हेन्टिलेटर आणि 95 ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची मदत पोहोच केली आहे. ब्रिटनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून अजून मोठी मदत लवकरच भारतात येणार असल्याचं ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कोरोनाची लस हे सर्वात मोठं हत्यार असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी वापरण्यात येत आहेत. त्यात आता आणखी एका लसीची भर पडणार असून रशियाची Sputnik V या लसीची पहिली खेप 1 मे पर्यंत भारतात दाखल होणार आहे.याशिवाय अमेरिकेने देखील कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन’
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी कशी कराल ? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
