Share

आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आरसीबीचे सलामीवीर कर्णधार विराट कोहली(१२) आणि देवदत्त पडिक्कल(१७) लागोपाठ बाद झाल्यानंतर रजत पटिदार(३१) आणि ग्लेन मॅक्सवेल(२५) यांनी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर एबी डिव्हीलीयर्सने पटिदारसोबत अर्धशतकी भागिदारी करत आरसीबीचा डाव सावरला. एबीने आखेरच्या काही षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीने २० षटकात ५ गडी गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. एबी डिव्हीलियर्सने आरसीबीकडून ४२ चेंडुत ३ चौकार आणि ५ षटकारासंह सर्वाधिक ७५ धावा केल्या.

आरसीबीने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन(६) आणि स्टीव्ह स्मिथ(४) लवकर बाद झाले. तर पृथ्वी शॉ २१ धावावर बाद झाला. यादरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने मार्कोस स्टॉयनीस (२२) सोबत भागिदारी करत संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्यानंतर शिम्रॉन हेटमायर (५३) सोबत रिषभने आक्रमक फटकेबाजी करत सामना दिल्लीच्या बाजुने फिरवला. मात्र मोहम्मद सिराजच्या आखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडुवर ६ धावांची गरज असताना रिषभ पंत केवळ चौकार मारु शकला. आणि हातातोडाशी आलेला दिल्लीचा घास सिराजने काढुन घेतला. दिल्लीकडून रिषभ पंतने ४८ चेंडुत ६ चौकरासह सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर हेडमायरने धडाकेबाज फलंदाजी करत २५ चेंडुत २ चौकार आणि ४ षटकारासह ५३ धावांची वादळी खेळी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!