Share

परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिल्ह्यात मंगळवारी १ हजार ३३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर २० रुग्णांचा मृत्यू झाला.७३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन या वेळी प्रशासनाकडून केले आहे.

रुग्णालयातील कक्षात ६ हजार ८६० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ८३३ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ३३ हजार १३३ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी २५ हजार ४४० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ३२ हजार ९४९ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत.

या केलेल्या तपासणीमध्ये १ लाख ९९ हजार ८४० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ३२ हजार ४२ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ९२७ अनिर्णायक, १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळवले आहे. जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमांते काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुन विना मास्क तसेच विना कारण घराच्या बाहेर फिरु नये,अन्यथा अँटिजन स्टेस्ट देखील करण्यात येणार असल्याचे या वेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या          

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!