नवी दिल्ली – देशात 18 वर्षावरील नागरिकांसाठी येत्या 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु होत असून, त्यासाठीची नावनोंदणी प्रक्रिया आज पासून सुरु होत आहे. देशातील लसीकरण मोहिमेच्या या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षावरील सर्व पात्र नाग्रिग को विन पोर्टल को विन. जीओव्ही इथ नावनोंदणी करू शकतात.
या टप्प्यापासून सर्वांसाठी प्रथम नोंदणी अनिवार्य केली असून, नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आयत्यावेळी नोंदणी करून लस घेता येणार नाही. सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार असून, सध्या सुरु असलेली 45 वर्षावरील नागरिकांच लसीकरण हि पुढे चालूच राहणार आहे.
नागरिकांना मोबाईल नंबरच्या आधारे ही नावनोंदणी करता येणार असून, त्यासाठी पोर्टल वर उपलब्ध अर्ज भरून, छायाचित्र असलेलं अधिकृत ओळखपत्र जोडावं लागणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या सोयीच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता आणि वेळ ही एस एम एस द्वारे कळवण्यात येईल.
हा मेसेज संबंधित लसीकरण केंद्रावर दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. यापुढे राज्य सरकारे, खाजगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्था यांना लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत घ्यायला आणि लसीकरण करायला केंद्रसरकारने परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन’
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग


